अकोला : खडकी -मलकापूर परिसर अकोला महानगरपालिकेमध्ये येऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे. तरी या परिसरातील भागाला विकासापासून मनपा प्रशासनाने दूर ठेवलेला आहे .आज पाच वर्षे होत असताना सुद्धा खडकी मलकापूर परिसरात नाल्या पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण तुडुंब भरलेले आहे. कोणत्याही प्रकारची या परिसरात नाल्यांची स्वच्छता होत नाही. रस्त्यांवर कचऱ्याचे चौकाचौकात ढीग लागले आहे .परंतु मनपा प्रशासन फक्त कर वसुली करण्यात व कर वाढवण्यात मसुरुला आहे. हद्दवाढ परिसर हा पहिलेच गोर- गरीब शेतकरी -- मजुरांचा परिसर आहे. त्यांना मनपाला हवे असलेले कर भरणे अशक्य असतानासुद्धा मनपाने स्वतःच्या फायद्यासाठी व या परिसराची लूट करण्यासाठी या गोरगरीब जनतेवर अन्याय करून हा परिसर मनापा हद्दीत घेतला. परंतु आज पर्यंतही महानगरपालिका परिसरात ज्या सुख सुविधा दिल्या जातात त्यातील अर्धी सुखसुविधा या परिसरात दिल्या जात नाही. यापेक्षा येथील जनतेचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीच्या सुविधा खूप चांगला होत्या. परिसरातील नाल्या, मोठे नाले व वेगळा वेगळ्या चौकात कचऱ्याचे गंज पडलेले आहे. फक्त कागदोपत्री घोडे नाचून स्वच्छता रेकॉर्ड वर दाखवल्या जात आहे. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची स्वच्छता या परिसरामध्ये केल्या जात नाही. स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी हे फक्त पगार घेण्यापुरतेच शिल्लक आहेत. लोकांनी अनेक तक्रारी केल्या वर सुद्धा महिना महिला परिसराची स्वच्छता केल्या जात नाही. अनेक नाल्यांचे पाणी हे खुल्या प्लॉटमध्ये जात असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात मच्छरांचा पादुर्भाव झालेला आहे . परंतु मनपा प्रशासन व कर्मचारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते. मनपा प्रशासन फक्त कर वसूली करण्याकरता जनतेच्या मागे लागलेले आहेत. या सर्व गोष्टीची अनेक वेळा मनपाकडे निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने अनेक तक्रारी केलेले आहेत. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मनपाच्या वतीने पावसाळा सुरू होण्याआधी या सर्व गोष्टीची कारवाई करून या परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा निर्भय बनो जनार्दनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयोजक गजानन हरणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे, सौ. यूगेश्वरी हरणे मा.पंचायत समिती सदस्य आदीसह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Post Views: 285
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay