नितीशा नितीन धुत बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Jun 2022, 8:37 PM
   

Akola : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल जाहिर झालेल्या बारावी परिक्षेच्या निकालात नितीशा नितीन धुत हिने ९३.६७ टक्के अग्रेसर गुणांनी नेत्रदिपक यश मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. ती आर.डी.जी.महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली नितीशा ही धर्मादाय नोंदणीतील अनेक संस्था,संघटनांचे व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथील समाजाभिमुख राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे कायदविषयक मार्गदर्शक अॕड.नितीन धुत यांची कन्या आहे.
नितीशाने सुध्दा वडील व तिच्या कुटूंबियातील वकीलांप्रमाणेच कायद्याच्या अर्थात विधी क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असून यासाठी यूपीएसच्या समकक्ष असलेल्या clat (विधी प्रवेश पूर्व परिक्षा) या परिक्षेसाठी भोपाल येथून प्रत्यक्ष व आँनलाईन तयारी पूर्ण केली आहे. clat परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू,असा विश्वास नितीशा हिने व्यक्त केला आहे. एल.एल.बी नंतर तिने एल.एल.एम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. दररोज महाविद्यालयीन वर्गातील शिक्षणासोबतच ठराविक वेळेत न चुकता अभ्यास व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे आपल्या यशाचे रहस्य असल्याचे मत तिने यासंदर्भात व्यक्त केले आहे.वडिल अँड नितीन धुत, आई ज्योती धुत यांच्या कडून पहिल्यापासून सातत्याने शिक्षणासोबतच विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी दिल्या जाणारे प्रोत्साहन सुध्दा  महत्वाचे ठरलेआहे. अनेक स्पर्धांसह वादविवाद स्पर्धेतही नितीशाने तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहरातील ख्यातनाम विधीज्ञ नरेंद्र धुत व अँड.मनिषा धुत हे नितीशाचे मोठे आई-बाबा आहेत. लहानपणापासून हुशार असलेल्या नितीशा हिने फुड सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी या विषयात १०० पैकी ९८ तर टेक्सटाइल मधे १०० पैकी ९५ गुण प्राप्त केले आहे. या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व विश्वप्रभात परिवाराकडूनही तिला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

    Post Views:  361


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व