मुंबईः महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारविरोधात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. कालचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका नुकतीच दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनात शपथ घेतली. याच शपथविधीला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गुरुवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी झाला तर शुक्रवारी सकाळीच शिवसेनेनं कोर्टात धाव घेत, हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात बाजू मांडतील.
Post Views: 318