भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव घर घर तिरंगा अभियानांतर्गत मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्यदिनी दि.15 ऑगस्ट 2022 रोजी तृतिय दिवसाचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि भारतिय स्वातंत्र्याचा जयघोष करण्यात आला. या स्वातंत्र्य महोत्सवाच्या पर्वात 3 दिवस ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष दिनकर घोरड, खजिनदार देवीदास घोरळ,जेष्ठ संचालक जे.टी. वाकोडे, सौ.शोभाताई तेलगोटे, गौतम तेलगोटे, दिगंबर ताले, व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे, रोखपाल कुंदा पवार, लेखापाल विक्की क्षिरसागर उपस्थित होते.

Post Views: 276
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay