पालघरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2022, 7:09 PM
   

पालघर-बोईसर (संतोष घरत) - पालघर जिल्ह्यातील शिवसेना पधिकार्‍यांसोबत बुधवार,दिनांक -14 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या भेटीदरम्यान  पालघर जिल्ह्यातील विकास कामासह विविध महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. 

    शिवसेना पक्ष पालघर जिल्ह्यात मजबुतीकरण करण्याकरिता, काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ह्या नियुक्ती मध्ये  पालघर उपजिल्हाप्रमुख पदी श्री. निलम संखे ह्यांची नियुक्ती करण्यात आली . तर बोईसर शहर प्रमुख पदी श्री. मुकेश पाटील ह्यांची  पत्र देण्यात आले नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. 
 ह्यावेळी विधान परिषद आमदार व पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय श्री. रवींद्र फाटक साहेब , पालघर जिल्हा प्रमुख श्री . राजेश शहा , पालघर जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश निकम, आणि मा. जिल्हाप्रमुख प्रभाकर राउल हे उपस्थित होते.

    Post Views:  491


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व