श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था कान्हेरी सरप येथे दिक्षांत समारोह


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Sep 2022, 11:16 AM
   

अकोला :  श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था कान्हेरी सरप येथे दि.17/9/22रोजी दिक्षांत समारोह  आणि मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.प्रवेश सत्र 2020-22 चे  विजतंत्री, तारतंत्री आणि जोडारी या तीन अभ्यासक्रम तून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना चा पुरस्कार आणि पदवी देऊन  गुणगौरव करण्यात आला .संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल देशमुख यांनी श्री विश्वकर्मा भगवान व श्री सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली .आणि श्री राहुल देशमुख आणि संस्थेचे प्राचार्य श्री उमेश सर लांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य श्री उमेश सर लांडे यांनी विद्यार्थ्याना ITI प्रशिक्षण घेतल्यावर पुढे कुठल्या क्षेत्रा मध्ये व्यवसाय,रोजगार,स्वयमरोजगरकरावा याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री पीएम चांदुरकर आणि आभार प्रदर्शन श्री इधोल सर यांनी केले कार्यक्रमास उपस्थित श्री अशोक देशमुख सर, प्रा. भाकरे सर, प्रा. गिते सर , उपस्थित होते.

    Post Views:  787


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख