पारस महाजनकोमधील उपोषण सोडविण्यात कामगार अधिकाऱ्यांना यश


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Oct 2022, 5:57 PM
   

अकोला - महाजनको पारस येथे कंत्राटी कामगारांचा उपोषण सुरू होते.या ठीकाणी  त्या अनुषंगाने आज दिनांक ०३ आक्टोंबर रोजी दुपारी ४.०० वाजेपासून अकोला कामगार आयुक्त. श्री राजू गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गौरव नालींदे सहकारी कामगार अधिकारी व दुकाने निरिक्षक श्री विनोद जोशी व श्री किरण राठोड  यांनी कामगार तसेच  व्यवस्थापन यांच्यात  चर्चा करून उपोषण सोडविण्याचे प्रयत्न केले. तडजोडीच्या सामंजस्यपूर्ण बोलणी नंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सर्व कामगारांनी उपोषण समाप्त कले.

    Post Views:  338


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व