सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी गीतेतील उपदेश अत्यंत उपयुक्त : डॉ रविंद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Nov 2022, 12:00 PM
   

वळती, ता हवेली पुणे: गिता ही कर्तव्यकर्म शिकविते, मोह त्यागून  क्षात्रधर्म पालनाचे उपदेश देते. गितेच्या रहस्यमय उपदेश्यामुळे युद्धभूमीवरील कर्म करण्यास असमर्थ ठरलेला अर्जुन युद्ध करायला तयार झाला. गीता कर्मयोग,भक्तीयोग , ज्ञानयोग तर शिकविते मात्र निष्काम कर्मयोग सुद्धा शिकविते.गीता सात्विक त्याग, सात्विक कर्म सात्विक कर्ता शिकविते. गीतेचा अर्थ योग्य प्रकारे समजून घेऊन निष्काम कर्मयोग करुन सात्विकता जपावी, सात्विक त्याग, सात्विक कर्म व सत्वगुणी व्यक्तीच दया, धर्म धारण करू शकते. धर्माचरण   केल्याने सुख शांती प्राप्त होतें ह्यासाठी सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी गीतातील उपदेश अत्यंत उपयुक्त आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. वळती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेस्वरी पारायण सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रवचन करताना डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की गीतातील उपदेश व श्लोक केवळ उपदेश नसून जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे मंत्र आहेत. जीवनात जन्म मृत्यू,सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी गीतातील उपदेश श्लोक महत्वाचे आहेत. ज्येष्ठ उद्योजक एल बी कुंजीर व सौ कुसुमताई कुंजीर ह्यांचे विशेष सहकार्याने व समस्थ गावकरी ह्यांचे वतीने वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    Post Views:  371


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व