पु. गोपाल महाराज यांच्या भागवत कथेचे भक्ती भावात समापन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 Nov 2022, 8:07 PM
   

अकोला-गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ व जेष्ठ समाजसेवी दिवंगत बाबुराव पवित्रकार यांच्या स्मृति प्रित्यर्थ आशीष पवित्रकार मित्र परिवारच्या वतीने स्थानीय स्थानिय जवाहर नगर येथील छत्रपती संभाजी महाराज पार्क येथे सुरू असलेल्या बालयोगी, भागवतकार पु गोपाल महाराज कारखेडकर यांच्या सात दिवसीय भागवत कथेचे हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या भक्तीभावात समापन करण्यात आले.या समारोपीय सत्रात पु गोपाल महाराज यांनी कृष्ण अवतार कार्य सांगून कथेस विराम दिला.समारोप समयी आ.अमोल मिटकरी उपस्थित होते.यावेळी माधवराव पवित्रकार, बाळासाहेब पवित्रकार,आशिष पवित्रकार यांनी पु गोपाल महाराज यांचे पूजन केले.तर जीवन देशमुख,
संगीत चमू यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.पु गोपाल महाराज यांचे स्वागत प्रशांत लोहिया, रणजित गावंडे,संदीप राऊत,मंगेश फुंडकर,योगेश पवित्रकार,गजानन गोलाईत,विनोद गुबे आदींनी केले.
आभार आशीष पवित्रकार,सौ डॉ कल्याणी पवित्रकार यांनी मानलेत.महाप्रसादाचे या सात दिवसीय उत्सवाची सांगता झाली.सफलतेसाठी आशीष पवित्रकार मित्र परिवाराच्या समस्त पदाधिकारी वर्गाने केले.

Connection failed: Operation not permitted