ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही… त्या दुधाची वासरे आहोत आपण


एजाज शेख यांच्या स्वच्छ हृदयाचे झरे गझल संग्रहाचे प्रकाशन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 1:05 PM
   

अकोला (दि. ३ डिसें) : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन,अकोला द्वारा एजाज़ शेख यांच्या स्वच्छ  हृदयाचे झरे या मराठी ग़ज़ल संग्रहाचे प्रकाशन डब्ल्यू.सी.टी.सी. सभागृह, मुख्य पोस्ट ऑफिस, अकोला येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजयजी आखाडे (IPoS) (वरिष्ठ डाक अधिक्षक,अकोला डाक विभाग ) होते. अफसर बानो (गझलकार एजाज शेख यांच्या मातोश्री) यांच्या शुभहस्ते गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याला गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मुख्य उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्याला डॉ. गजानन नारे (सदस्य,अ. भा. म.सा.महामंडळ मुंबई ); तुळशीराम बोबडे (कार्याध्यक्ष,अंकुर साहित्य संघ अकोला); पुष्पराज गावंडे (सदस्य म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई); कॉ.सुरेंद्रजी पालव (कार्याध्यक्ष ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन,नई दिल्ली); मोहम्मद एजाज (पोस्टमास्टर मुख्य डाकघर, अकोला);  शकील हसरत (सुप्रसिद्ध जेष्ठ उर्दू शायर,भुसावळ); सुनील हिवराळे (सहायक डाक अधिक्षक,अकोला) ; निळू बावस्कर (सहायक डाक अधिक्षक,सेंट्रल सब डिव्हिजन); सिद्धू ननीर (तक्रार निरीक्षक,अकोला); अल्तमश शम्स (से.नि. सब पोस्टमास्तर व सुप्रसिद्ध उर्दू शायर); जावेद अन्सारी (से.नि. लिपिक,जळगाव आकाशवाणी); घनश्याम अग्रवाल; डॉ. राजेश देशमुख, नईम फराज, मोईन गोहर; अनस नबील ; एजाज बिस्मिल आणि  हारून उस्मानी (सुप्रसिद्ध निवेदक) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक कॉ.शाकिर अहमद, असिस्टंट सर्कल सेक्रेटरी, ऑल इंडिया पोस्टल युनियन( ग्रुप सी),महाराष्ट्र सर्कल. यांनी केले. प्रकाशन सोहळ्याचे निवेदन नरेंद्र गिरिधर (नागपूर) यांनी केले. संजय शिंदे(प्रकाशक अष्टगंध प्रकाशन,मुंबई) आणि विशाल राजगुरू यांनी संग्रहावर भाष्य केले. स्वच्छ हृदयाचे झरे या गझल संग्रहातील गझल नितळ मनातून लिहिल्या गेली असल्यामुळे ती अस्सल अनुभूती देते. असे मत संजयजी आखाडे यांनी व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याचे सगळे आभार प्रदर्शन एजाज शेख यांनी केले.
 स्वच्छ  हृदयाचे झरे या मराठी गझल संग्रहाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्रातील नामवंत मराठी गझलकारांचा गझल मुशायरा शकील हसरत भुसावळ अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यात सतीश दराडे, विशाल राजगुरु, नितिन देशमुख, अमोल शिरसाट, निलेश कवडे आणि अविनाश येलकर यांनी दमदार सादरीकरण केले. मुशायऱ्याची दमदार सुरुवात सतिश दराडे यांनी रंग कर्जाने दिला शेतास अमुच्या, देश मग टिव्हीत हिरवागार झाला या शेराने केली. तरन्नूम गझलचे बादशाह गझलकार नितीन देशमुख यांच्या दगडावरती झोप लागते, कष्टाला कुठली अंगाई या शेराला रसिकांची विशेष पसंती मिळाली. त्यांच्या डाळिंबाच्या ओठांवरती… श्वास माझे मी.. या रचनांनी मैफिल प्रचंड उंचीवर नेली. अमोल शिरसाट यांच्या विषय संपला या गझलेने प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली. निलेश कवडे यांच्या कुणी पाहू नये माझ्या कधी जवळून शर्टाला… नवा गणवेष केला मी जुन्या उसवून शर्टाला… , विशाल राजगुरू यांच्या दिवसाढवळ्या नकोस मारू डोळे, रात्री माझा डोळा लागत नाही , हसता हसता क्षणात जर ती दुःखाचे फूल बनवते, तिच्या मनाच्या लेणीमध्ये बुद्धाशिवाय कुणी नाही या शेराला रसिकांनी विशेष पसंती दिली. मुशायऱ्याचे बहारदार निवेदन करणाऱ्या गोपाल मापारी यांच्या इथे बांधेल ती घर शक्यता कमी आहे, मनाचा माझा हा म्हणे दक्षिणमुखी आहे या शेराने मैफिलीत रंगत आली. मैफलीचा समारोप एजाज शेख यांच्या स्वच्छ हृदयाचे झरे आपण या गझलेने झाला. त्यांच्या ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही… त्या दुधाची वासरे आहोत आपण या शेराने मानवतेचा संदेश दिला. मुशाऱ्याचे अध्यक्ष शकील हसरत यांनी
के बहुत बुरा लगता है दुश्मन सर रख देते है कदमो में… खूद्दारी में कट भी जाये तो सर अच्छा लगता है… या गझलेले मुशायऱ्याची सांगता केली. एजाज़ शेख यांच्या स्वच्छ  हृदयाचे झरे या मराठी गझल संग्रहाच्या प्रकाशनाला आणि गझल मुशायऱ्याला रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. रसिकांमध्ये  किशोर बळी हिंमत ढाळे शिवलिंग काटेकर डॉ ममता इंगोले प्रा सदाशिव शेळके प्रशांत असनारे विद्या बना फार विद्या राणे डॉ. अलका बोर्डे, चंद्रकांत झटाले, शरद वानखडे, विजय कौसल, डॉ. विनय दांदळे यांची विशेष उपस्थिती होती. कॉ.शाकिर अहमद, असिस्टंट सर्कल सेक्रेटरी, ऑल इंडिया पोस्टल युनियन( ग्रुप सी), महाराष्ट्र सर्कल. यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.

    Post Views:  376


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

डमी न्युज

४२ मिनेट