अबॅकस स्पर्धेत यशस्वी झालेल्या श्रावणी शेळके हिचा सत्कार


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Dec 2022, 6:32 PM
   

अकोला - चेन्नई येथे आयोजीत राष्ट्रीय प्रोडीसी अबॅकस स्पर्धेत स्थानिक पोददार इंग्लिश स्कुल ची वर्ग ४ मधील विद्यार्थीनी श्रावणी राहुल शेळके हिने लेव्हल चार मध्ये सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ४२०० विद्यार्थी तर अकोला जिल्हयातून स्थानिक इ- झोन सिप अबॅकस चे ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या यशाबद्दल आमदार रणधिर सावरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी श्रावणीचे कौतुक करून तिचा सत्कार केला. पोद्दार स्कुल मध्ये सुध्दा प्राचार्या निता तलरेजा, ब्रिजेश नायर व इतरही शिक्षकांनी हया कार्यक्रमात श्रावणीचा सत्कार केला. या प्रसंगी अबॅकसच्या मुख्याध्यापिका नीरा सहानी, श्रावणीचे आई-वडील राखी शेळके, राहुल शेळके, आजोबा विनायकराव शेळके, आदी उपस्थित होते.


Connection failed: Operation not permitted