अकोला: बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे बुलडाणा येथे आयोजित विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अकोला येथील करण रणपीसे याने ७० किलो वजनगटात तृतीय क्रमांक प्राप्त केला. बुलडाणा येथील सहकार विद्यामंदीरात ११ डिसेंबर रोजी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ७० किलोवजन गटातून करण रणपीसे यांने उत्कृष्ट प्रदर्शन करुन तृतीय क्रमांक प्राप्त केला. करण यास प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ राज मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, डॉ. ब्रिजमोहन झंवर व आ. श्वेता महाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यास्पर्धेत अकोला, मलकापूर, खामगाव, अमरावती, नागपूर, वाशीम, चंद्रपूर आणि संपूर्ण विदर्भातून स्पर्धक सहभागी झाले होते.
Post Views: 236
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay