अकोला - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होत असून मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावी तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदानाचा आधीचा दिवस दि.१७, मतदानाचा दिवस दि.१८ व मतमोजणीचा दिवस दि.२० रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होत आहेत त्या ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्यांना लागू असून या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Post Views: 224
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay