अखेर सत्याचा विजय पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना अटपुर्व जामीन मंजूर!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Dec 2022, 10:45 AM
   

(स्वप्निल देशमुख) संग्रामपूर -१७ डिसेंबर२०२२रोजी १० ते ११ वाजताच्या दरम्यान ज्ञानेश्वर पाटील हे घरीच  असल्याचे सी. सी. टीव्ही फुटेज वरून लक्षात आले असतांना सुध्दा सुनंदा पुरुषोत्तम अढाव राहणार काकणवाडा खुर्द यांनी स्वतःला व  त्यांचे पती पुरूषोत्तम अढाव व मुलगा मंगेश अढाव  यांना वाचविण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर पाटील दांदळे विरूद्ध खोटी तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर पाटील अधिक तीन जण यांनी त्यांच्या घरात घुसुन त्यांना लोटपाट केली व घराबाहेर ओढत आणले अशी खोटी व बनावटी फिर्याद सुनंदा अढाव यांनी  दिल्यावरून अप क्र. ३८९/२०२२ तामगाव पोलीस स्टेशनला दाखल केली होती. मात्र तक्रार खोटी असल्याने  ज्ञानेश्वर पाटील यांनी अँड. विद्यासागर अलोणे व अँड निवृती वाघ यांच्या मार्फत सत्र न्यायालय खामगाव येथे अटपूर्व जामीन अर्ज दाखल केला.  त्यावरील युक्तीवाद व आवश्यक कागदपत्रे  सादर केल्यानंतर ज्ञानेश्वर दांदळे पाटील व इतरांनाअतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय खामगाव न्यालयाने अटपुर्व जामीन मंजूर केला.  तसेच दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वत:च खड्ड्यात कसा  पडतो याचा या प्रकरणातून प्रत्यय आला.मंगेश अढाव, पुरूषोत्तम अढाव, व सुनंदा अढाव,  यांच्या विरूद्ध पोलीस स्टेशन तामगाव येथे दिव्यांग महिलेच्या फिर्यादीवरून अप क्र ३८८/२०२२ हा गुन्हा दाखल होता. मात्र पोलीसांनी चिरीमीरी करून दिव्यांग व्यक्ति चे अधिकार  अॕक्ट २०१६  कलम ९२ न लावता आरोपी यांना संग्रामपुर कोर्टात  हजर केले होते. मात्र फिर्यादीच्या वतीने अॕड. विद्यासागर अलोणे व निवृती वाघ यांनी हरकत दाखल केल्या नंतर आरोपींना विशेष न्यायालयात हजर करण्याचे आदेश संग्रामपुर न्यायालयाने पारीद केले होते. मात्र पोलीसांनी न्यायालयाचे आदेशाचा अवमान करून, आरोपीनां गैरकायदेशीर रित्या पोलीस स्टेशन तामगाव येथे ठेवले. आरोपी सुनंदा अढाव, पुरुषोत्तम अढाव  व मंगेश अढाव यांना सर्व सूख सुविधा पूरविल्या चा आरोप पिडीतेकडून करण्यात येत आहे. तसेच वर नमुद आरोपी सुनंदा अढाव, पुरुषोत्तम अढाव व मंगेश अढाव यांना, दि. २२डिसेंबर२०२२ ते २७ डिसेंबर २०२२ पर्यत न्यायालय कोठडीचाही अनूभव घ्यावा लागला.

सदर प्रकरणात न्यायालयाचा अवमान इाालेला आहे.तसेच दिव्यांग व्यक्ति अधिकार कलम ९३ चे उल्लंघन इााले असून ठाणेदार व चौकशी अधिकारी तसेच संबंधितांविरूद्ध लवकरच कायद्याच्या तरतूदी नुसार कार्यवाही करण्यात येईल. 
 ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ 
श्री विद्यासागर अलोणे
मो.नं. 9421110777

    Post Views:  229


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व