अकोला: अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांतजी पवार यांचे निर्देशानुसार अखिल महिला मराठा महासंघाच्या अकोला महानगर सरचिटणीस पदी कल्याणीताई ठाकरे यांची नियुक्ती अखिल भारतिय मराठा महासंघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे आणि जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. गरजवंताच्या हाकेला धावून जाणार्या कल्याणीताई ठाकरे यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्या अखिल भारतिय मराठा महासंघाच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात आणि म्हणूनच समाजसेवेची आवड असल्याने त्यांना आता अखिल भारतिय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता येईल. यावेळी अखिल भारतिय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 209
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay