बुलढाणा वकील संघात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे विमोचन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  17 Jan 2023, 6:36 PM
   

(ज्ञानेश्वर दांदळे) बुलढाणा : बुलढाणा जिल्हा बार असोसिएशनमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या नाविण्यपूर्ण आकर्षक दिनदर्शिकेचे एक स्तूत्त्य उपक्रम  म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात विमोचन नुकतेच करण्यात आले.बुलढाणा बार असोसिएशन चे अध्यक्ष अॕड. विजयी सावळे व सचिव अॕड.अमर इंगळे यांनी बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचे विमोचन केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष स्वप्निल देशमुख यांनी यावेळी पत्रकार महासंघाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार कल्याण आणि सामाजिक परिवर्तन,जागृती तथा समाज साधनेच्या कार्यात अंधूक उपक्रमातून अभिनव संकल्पनेने सक्रिय झालेल्या या पत्रकार महासंघाच्या कौस्तूकास्पद वाटचालीचे अॕड.सावळे व अॕड इंगळे तथा पदाधिकारी आणि वकील मंडळीने यावेळी कौतूक केले.वेळोवेळी सहकार्यासाठी पत्रकार महासंघासोबत राहण्याचे मनोदय व्यक्त करून भावी वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या.  यावेळी जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख यांच्यासह लोकस्वातंत्र्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचे कायदेविषयक मार्गदर्शक,ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ  श्री.विद्यासागर अलोने ,एम.सी.एन.व युवा मराठाचे पत्रकार श्री.ज्ञानेश्वर दांदळे पाटील व वकील बांधव उपस्थित होते.

    Post Views:  217


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व