अकोला : स्थानिक शिवाजीनगर खडकी अकोला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये दिनांक 8 एप्रिल 2023 ते 15 एप्रिल 2023 पर्यंत 7 दिवशी कीर्तन महोत्सव व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथा च्या सप्ताहाचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या सप्ताह मध्ये सकाळी 5 ते 6 काकडा, 9.30ते 11.30 संत तुकाराम महाराज गाथा पारायण निरूपण ,संध्याकाळी 5.30 ते 6.30 हरिपाठ , रोजरात्री 8 ते 10 हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 एप्रिल ला ह भ प विजय महाराज गवळी , दि.9ला ह भ प शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव, दी.10 ला ह भ प अशोक महाराज इलग शास्त्री, दि.11 ला ह भ प महंत समाधान महाराज भोजेकर, दि. 12 ला गोपाल महाराज सरकटे, दि. 13 ला ह भ प विलास महाराज महाजन, दि. 14 ला ह भ प सोपान महाराज सानप शास्त्री, दि.15 ला सकाळी 9.30 ते 12 पर्यंत काल्याचे किर्तन ह भ प रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर यांच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. तसेच रोज सकाळी संत शिरोमणी तुकाराम महाराज गाथेचे निरूपण व्यासपीठ ह भ प संदीप महाराज मातेकर ( मध्यप्रदेश) हे करणार आहेत. सामूहिक महा आरती 12 वाजता तर महाप्रसाद 12.30 वाजता पासून सुरू होणार आहे. ह भ प श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठा( श्रद्धा सागर) चे अध्यक्ष ह भ प वासुदेव महाराज महल्ले पाटील, ह भ प प्रशांत महाराज ताकोत, ह भ प गजानन महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह उत्साहात पार पडणार आहे. या सप्ताह मध्ये गायनाचार्य म्हणून ह भ प किशोर महाराज तळे, ह भ प दिलीप महाराज कोळभादे, ह भ प अवचूत महाराज , ह भ प हरी महाराज ढोरे हे आपली सेवा देणार आहेत. टाळकरी मंडळी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंडळ शिवापूर, हरिहर भजनी मंडळ जोगेश्वरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम, श्री संत ज्ञानेश्वर हरिपाठ भजनी मंडळ देगाव आदि मंडळी सेवा देणार आहे. चोपदार म्हणून ह भ प किसनराव जानोकर चांदूर, कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक खांनजोडे सर हे करणार आहे. तरी या कीर्तन महोत्सवाचा लाभ खडकी परिसरातील, पंचकोशीतील नागरिक महिलांनी घ्यावा अशी विनंती आयोजक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजीनगर खडकी अकोला यांच्या वतीने करण्यात आली आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे ह भ प विठ्ठल शेंडे महाराज यांनी कळविले आहे.
Post Views: 176
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay