आनंद शिधा वाटपामुळे महाराष्ट्रासह बोईसर मधील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Apr 2023, 12:40 PM
   

बोईसर : (संतोष घरत) - महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर सणासुदीला गरिबाला आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय झाला. दिवाळीत लाखो लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. या मागचा हेतू असा होता की सणासुदीला कोणीही उपाशी राहू नये प्रत्येकाच्या घरात गोडधोड व्हावे ह्या उदात्त हेतूनही योजना सुरू करण्यात आली होती.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती परत एकदा आनंदाचा शिधा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचला. आणि योगायोग असा गुढीपाडवा, रामनवमी,हनुमान जयंती, रमजान महिना,  असे अनेक सण ह्या वेळेस लागोपाठ आले, ह्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ह्याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. महाराष्ट्रातही लाखो कुटुंबानी याचा फायदा घेतला आहे.
   आज बोईसर  ग्रामपंचायत हद्दीतील ७ रास्त भाव दुकानांमध्ये बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलम संखे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा, कामिनी सुतार व येथिल  ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज लाभार्थ्यांना आनंदाचा शिधावाटप करण्यात आला.  माननीय मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने लाभार्थ्यांना फक्त १०० रुपयात उपलब्ध करून दिले. याचा लाभ नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट नुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना झाला आहे . विरोधकांनी कितीही टीका करा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सरकार दमदार पावलं टाकत आहे. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे , धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार गोरगरिबांपर्यंतशासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम शिवसेना बीजेपी चे सरकार  महाराष्ट्रात करत आहे.

    Post Views:  485


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

अत्त दीप भव

४२ मिनेट