चिंचोली गणू शाळेत आंबेडकर जयंती साजरी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Apr 2023, 8:05 PM
   

अकोला-महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू येथे संपन्न झाली ह्यावेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे यांनी फोटोला हार अर्पण अर्पण केले तसेच शाळेतील शिक्षक श्री रेवासकर सर श्री दिनेश भटकर सर श्री विकास वाडकर सर श्री बाहेर सर व सौ संगीता भटकर मॅडम यांनी सुद्धा फोटोला हार अर्पण केले तसेच शाळेतील सौ गोतमारे मॅडम व तुळसाबाई सदार यांनी हार अर्पण करून पूजन केले तसेच सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांची महामानवावर भाषण झाली तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्न केले तसेच अंगणवाडी सेविका सौ वंदना गवाडे यांनी सुद्धा हार पण करून विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू चे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ह्या कार्यक्रमाचे संचालन संगीता भटकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सौ वंदना गवाडे यांनी केले

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व