शिक्षण विवेक आणि डेक्कन एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलने भरघोस यश संपादन केले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांसाठी काव्यअभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यापीठ हायस्कूलला इयत्ता सातवी/ आठवीच्या गटामध्ये तृतीय क्रमांक , इयत्ता नववी/ दहावीच्या गटामध्ये द्वितीय क्रमांक. तर शिक्षक गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त.
अनंत भावे, नीलिमा गुंडी, संगीता बर्वे, संदीप खरे या कवींच्या बालकविता सादर करण्याचे आव्हान सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी लीलया पेलले.
स्पर्धेसाठी शहरातील एकूण 1500 विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभाग झाले. पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठी साहित्याचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व,सभा धीटपणा इ.गोष्टी त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मांडल्या. विद्यापीठ हायस्कूल मधील सातवी /आठवीच्या गटामध्ये सार्थक गोरे, संभाजी जाधव, आणि साहिल तर नववीच्या गटामध्ये चैतन्य मगर ,वैष्णवी झोरे, प्रतीक्षा सावंत यांना पारितोषिक प्राप्त. शिक्षक गटामध्ये गौरी गोळे, स्नेहा वाघमारे आणि स्मिता जाधव यांना पारितोषिक प्राप्त. प्रशालेने या स्पर्धेत आपला उल्लेखनीय सहभाग नोंदविल्याबद्दल ट्रॉफी देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे व सर्व विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.
Post Views: 184