अनंत चतुर्दशी निमित्त सातव चौकात गणेश विसर्जन कुंड
प्रभाग तीन व सहासाठी निलेश देव मित्र मंडळाचा उपक्रम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
26 Sep 2023, 7:33 PM
अकोला : अनंत चतुर्दशी अर्थात ता. गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी उत्साहात वाजतगाजत बाप्पाला निरोप दिला जातो. नदी, विहिरी, तलाव यांचे वाढते प्रदुषण बघता सन २०१५ पासुन स्व.अॅड.धनश्री देव यांनी पुढाकार घेवुन सातव चौकात या भागातील पहिला कृत्रीम विसर्जन कुंड कार्यान्वित केला होता. प्रभाग तीन आणि सहा मधील भाविकांना गणेश मूर्तीचे विर्सजन सुरक्षितपणे करता यावे यासाठी अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अँड.धनश्री देव रुग्णसेवा उपकरण बँक, निलेश देव मित्र मंडळ, लायन्स क्लब ऑफ मीडटाऊन ( गोल्ड) यांच्या वतीने सातव चौकात गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. सोबत श्रावण महिन्यापासुन गणेशोत्सव पर्यंत निर्माण झालेल्या निर्माल्य संकलनाकरीता निर्माल्य रथ मागील १३ वर्षीपासुन कार्यान्वित करण्यात आला आहे. हा निर्माल्य रथ बुधवार,दिनांक २७ सप्टेंबर पासुन कार्यान्वित करण्यात येणार आहे. भाविकांनी या विसर्जन कुंडाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दहा दिवस गणेशाची पूजा करण्यासाठी वापरण्यात आलेले हार, फुले, दुर्वा व बेलपत्र आदी निर्माल्य विसर्जनाच्या दिवशी पाण्यात टाकल्याने जलप्रदुषण होते. हे टाळण्यासाठी खास निर्माल्य कलश ची व्यवस्था निलेश देव मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात आली आहे. भाविकांनी महालक्ष्मी आणि गणेशोत्सव तसेच श्रावण महिन्यातील सर्व निर्माल्य या निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निर्माल्य संकलनन कलश येणार घरोघरी....
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी निर्माल्य रथ व कलश घरोघरी येणार आहे. प्रभाग क्रमांक तीन व सहामध्ये हे निर्माल्य संकलन करत त्यातून खत आणि धुपबत्ती तयार करण्यात येणार आहे. मागील १३ वर्षीपासुन अॅड.धनश्री देव यांच्या पुढाकाराने अकोला जिल्ह्यातील पहिल्या निर्माल्य रथ संकलन त्या पासुन खत निर्मिती करुन प्रभागातील नागरिकांना देण्यात येत आहे. हे खत वाटप दरवर्षी पावसाळ्यात करण्यात येते. यावर्षी पासुन आपण दिलेल्या निर्माल्य पासुन खत निर्मिती सोबत निर्माल्य पासुन धुपकांडी तयार करण्याचा उपक्रम आपण आपलं सर्वांच्या सहकार्याने हाती घेत आहोत. अशी माहिती विविध प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी दिली आहे.
Post Views: 225