बोईसर ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Dec 2023, 10:59 AM
(संतोष घरत) बोईसर : बोईसरमध्ये ग्रामपंचायत लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होणे म्ह्णूनच बोईसर नगरपरीषद किंवा नगरपालीका करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांनी केली आहे. बोईसर नगरपरीषद अस्तित्वात येईल या आशेवर असलेल्या बोईसर मधील नागरिकांची राजकीय ईच्छाशक्ती नसलेल्या राजकीय पुढाऱ्यांनीच भ्रमनिराश केल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे. बोईसर नगरपरिषद व्हावी यासाठी शासनाकडे अनेकवेळा अहवाल सादर करण्यात आले आहेत मात्र हे सर्व अहवाल मंत्रालयात धूळ खात पडून आहेत. त्यावर पुढे काहीच घडले नाही.पालघर बोईसर मुख्य रस्स्यावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे.पालघर बोईसर हे ११ किमी असले तरी दोन्ही भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. बोईसर व लगतच्या ग्रामपंचायकतींचा नागरी भागामुळे शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे मुख्य बाजार पेठ,रेल्वे स्टेशन,बसस्थानक,रिक्षा स्टँड, बँक,पोस्ट,दुकाने मॉल,आठवडे बाजार, शाळा या बोईसर ग्रामपंचायत हद्दीत आहेत तसेच २५ ते ३० हजार कामगार, प्रवाशी येथे येत असतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीत असणारी मतदार संख्या जवळपास ७० हजाराच्या घरात आहे आणि लोकसंख्या जवळपास ९० हजाराच्या घरात आहे असे असूनही काही स्थानिक राजकीय कारणामुळे सदर ग्रामपंचायतीचे रूपांतर अजूनही नगरपालिकेत झालेले नाही त्यामुळे सदर बोईसर गावातील नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
बोईसर आशियातील सर्वात मोठी तारापूर औदयोगिक वसाहत देशातील पहिले अणुशक्ती केंद्र असून देखील आजपर्यंत या गावांना ग्रामपंचायतीच्या भरवश्यावर काम करावे लागते. स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी आपापले हितसंबंध जोपासण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत नगरपरिषद ही आजतागत होऊ शकली नाही.या संपूर्ण परिसराचा कारभार एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असावा यासाठी विरोध करतात का असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
तसेच स्थानिक नेते देखील जनतेला वेळोवेळी खोटी आश्वासन देतात येथील लोकप्रतिनिधी केवळ निवडणूका काळापूर्तीच नागरीकांना भाबडी आश्वासन देतात,राजकीय ईच्छाशक्ती दिसून आली नाही त्यामुळे पालघर नगरपरिषद बोईसर ग्रामपंचायत विकास होताना दिसत नाही. सुसज्ज रस्ते, गटारे,कचरा व्यवस्थापन, वाहन स्थळ,उद्याने,मैदान, पथदिवे आणि सांडपाणी निचरा होण्यासाठी बोईसर मध्ये दयनीय अवस्था झाली आहे . शहरात एकही उद्यान व मैदान नाही मैदानसाठी राखीव ठेवलेले भूखंड विकासकांनी गिळंकृत केले. बोईसर शहर असल्याचे भासवून येथील परिसरात गृह प्रकल्प उभारले जात आहेत अनेक विकासक नकश्यावर सुंदर रस्ते सुविधा दाखवून त्याची जाहिरात करत आहेत.त्यातच घराच्या किंमती सामन्याच्या आवाक्याबाहेर असल्याने बेकायदा बांधकाम उत आलेला आहे. असलेल्या गटारींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जर बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत झाले तर नगर विकास खात्याकडून मिळणारा मोठा निधी बोईसरच्या विकासात भर घालु शकतो. अशा सर्व प्रश्नांना घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष मराठे यांचा मार्फत रा.कॉ.पा.चे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले.
Post Views: 266