सभापती शिरीष धोत्रे व्हाईस ऑफ मिडीयाकडून सन्मानित
अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय शिरीषभाऊ धोत्रे यांचा ते सभापती झाल्याबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे वतीने साप्ता. विंगचे विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर, साप्ता.विंगचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर व साप्ता.विंगचे कार्याध्यक्ष संजय निकस पाटील यांनी पुच्छगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.
दि. १२ जानेवारी २०२४ रोजी पदाधिकाऱ्यांची मिटींग बोलावण्यात आली होती. तसेच कलर्स वाहीनी वरील ‘सुर नवा, ध्यास नवा या सुप्रसिद्ध शोचे विजेते गोपाल गावंडे या शेतकरी पुत्राच्या गायकाचा सभापती शिरिष धोत्रे यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. तडफदार गायक गोपाल गावंडे याने १००० स्पर्धकांमधून तो विजेता ठरल्याबद्दल त्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले, कार्यकारी मंडळातील सन्मानीय अभिमन्यु शंकरराव वक्टे, मुकेश श्रीराम मुरुमकार, राजेश अवचितराव बेले, सचिन भाऊराव वाकोडे, विकास नानाराव पागृत, रामेश्वर विश्वनाथ वाघमारे, दिनकर मधुकरराव नागे, सौ. शालुताई गजानन चतरकर, दिनकर ओंकरराव वाघ, सौ. माधुरी शाम परनाटे, भरत प्रभाकरराव काळमेघ, चंद्रशेखर रामभाऊ खेडकर, संजय बाबुराव गावंडे, चंदु छोटु चौधरी, वैभव हरिभाऊ माहोरे, राजीव ज्योतीप्रकाश शर्मा, सचिव सुनिल सुधाकरराव मालोकार यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांचा विश्वास हाच बाजार समितीचा श्वास आणि याच ध्येयासाठी कटीबद्ध असलेली विदर्भातील अग्रेसर व शेतकऱ्यांना विविध आर्थिक मदत देणारी भारतातील अग्रेसर बाजार समिती शेतकऱ्यांना अल्पव्याज दरामध्ये शेतमाल तारण योजना राबविणारी अग्रगण्य बाजार समिती म्हणजे लोकनेते वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला होय.याचे नेतृत्व सन्माननीय शिरीषभाऊ धोत्रे यशस्वीपणे करीत आहेत. साप्ताहिक नारी ललकार परिवारातर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
Post Views: 188