खोर येथील गाव तलावातील बुडालेल्या युवकाचा मृतदेह रात्री 2 दोन वाजता शोधुन बाहेर काढले....
हा युवक धरणात नेमका कुठे बुडाला हे माहीती नसल्याने तसेच 25 फुट खोल पाणी आणी धरणातील मध्य भागात मोठा नाला असल्याने शोध कामात स्थानिकांना अडथळे निर्माण होत होते. शेवटी अखेर रात्री पिंजर येथील रेस्कयु टीमला पाचारण करण्यात आले आणी पुढे..... अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रात्री दोन वाजता गाव तलावातील 25 फुट खोल पाण्यातुन एका तासात अमर काकडेचा मृतदेह शोधून काढलाच
मेवना राजा ता.देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील अमर विज्ञान काकडे अंदाजे वय 20 वर्ष हा 9 मे 2024 रोजी रायपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोर ता.चिखली जिल्हा बुलढाणा येथे विवाह समारंभात आला होता खोर गावाला लागुनच असलेल्या गाव तलावात अमर काकडे 9 मे रोजी सायंकाळी बुडाला असल्याची माहीती गावातील लोकांनी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे सर यांना दीली 9 आणी 10 मे पासुन अमर काकडेचा तलावात शोध चालु होता मोठ्या प्रमाणात तळाशी गाळ असुन धरणात मधात नाला असल्याने तसेच धरणात 25 फुट खोल पाणी यामुळे शोध कार्यात अडथळे निर्माण होत होते 10 मे रोजी अखेर चिखली चे तहसीलदार संतोष काकडे सर यांनी अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना सदर घटनेची माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हा दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी ऋषिकेश राखोंडे,विष्णु केवट,शेखर केवट, यांचेसह रेस्क्यू बोटसह शोध व बचाव साहित्य घेऊन रात्री 11:00 वाजता घटनास्थळावर पोहचले आणी आपल्याच रेस्क्यु वाहनातील जनरेटर लाईट सेटप धरणातील काटावर लावुन तहसीलदार संतोष काकडे सर यांच्या आदेशाने ठाणेदार राजपुत सर यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन चालु केले शेवटी 11 मे रोजी रात्री 1:30 वाजता तळाशी असलेला मृतदेह पथकाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने धाडस करत शोधुन काढलाच.यावेळी तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी संजय चौधरी,तलाठी हर्षल देशमुख,ठाणेदार राजपूत सर,आणी पोलीस कर्मचारी तसेच खोर सरपंच दिपक हागे व नातेवाईकांसह गावातील नागरिक हजर होते अशी माहीती खोर चे मंडळ अधीकारी संजय चौधरी यांनी दिली आहे.
Post Views: 219