मलकापूर येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Jul 2024, 11:22 AM
   

अकोला : मलकापूरचे लोकप्रिय नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशन जळगाव व मा .मंगेश भाऊ काळे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मलकापूर येथील गवळी मंगल कार्यालय मध्ये दिनांक पाच जुलै 2024 ला सकाळी नऊ ते पाच पर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये मोफत ई. सी. जी. काडी ओग्राफ, रक्तदान तपासणी, मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, पिताशय खड्डा, कान नाक कर्करोग बालरोग, मेंदू मनका फ्रॅक्चर, घसा शास्त्रक्रिया, नेत्र शिबिर, हृदयरोग, जनरल मेडिसिन, गर्भ पिशवी, अस्थिरोग , मंचर पेंट आजार आधी अनेक आजारांवर मोफत तपासणी,औषध उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे तरी या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी महिलांनी घेण्याचे आवाहन मंगेशभाऊ काळे मित्र परिवाराच्या वतीने निलेश कांकडे, प्रमोद धर्माळे आदींनी केली आहे. 

    Post Views:  236


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व