पुरुषोत्तम पाटील ढोले स्व.कमल किशोर बियाणी प्रामाणिक व उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित.!


 विश्वप्रभात  21 Jul 2024, 6:36 PM
   

अकोला : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात दैनिक महासागरचे आवृत्ती संपादक ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम पाटील ढोले यांना सन 2023 /24 चा स्वर्गीय कमल किशोरजी बियाणी स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शहरी विकास वार्ता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने निमवाडी अकोला येथील पत्रकार सभागृहात पुरुषोत्तम पाटील ढोले दैनिक महासागराचे आवृत्ती संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गेल्या 25 वर्षापासून प्रामाणिकपणे व चारित्रसंपन्न पत्रकारितेत यशस्वीपणे उल्लेखनीय कार्य करीत असलेले  व आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये अविरत काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्वर्गीय कमलकिशोरजी बियाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शहरी विकास वार्ता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने युवा खासदार अनुप संजयजी धोत्रे, आमदार वसंतबाबू खंडेलवाल, माजीमंत्री प्रा.अजहर हूशेन साहेब , पत्रकार संघाचे माजी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मीर साहेब, सचिव प्रमोद लाजुरकर  आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत , शुभहस्ते शाल श्रीफळ ,रोख , स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम पाटील ढोले यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट निष्ठेने सेवाभावी वृत्तीने त्यांचे काम चालू असते. अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन होत आहे. निर्भय बनो जण आंदोलनाच्या वतीने संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

    Post Views:  126


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व