शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन
अकोला - स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात दरवर्षी स्वर्गीय शंकरलालजी खंडेलवाल उपाख्य काकाजी यांच्या जन्म जयंती निमित्ताने प्रेरणा सोहळा आयोजित करण्यात येतो, त्यानिमित्ताने आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी शिशिर टकोरे आणि वेदांत खिरेकर यांचे पालक श्री कैलाश टकोरे व सौ ममता टकोरे आणि श्री संजय खीरेकर व सौ योगिता खिरेकार हे उद्घाटक म्हणून लाभले होते. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. ताराताई हातवळणे, कोषाध्यक्ष मा. अरुणजी कुलकर्णी, सचिव मा. गोपालजी खंडेलवाल, सदस्य सौ रेखाताई खंडेलवाल, मधुर खंडेलवाल आणि सौ नेहा खंडेलवाल उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉक्टर जे एम साबू सर, आयोजन समितीचे डॉ निशा वराडे, श्री शेखर दीक्षित, श्री आकाश कुळकर्णी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विवेक माने, डॉक्टर अविनाश थोटे पर्यावरण समिती समन्वयक डॉक्टर रवींद्र रेवासकर, सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि एनसीसी चे विद्यार्थी यांच्या मोलाचे सहकार्य लाभले
Post Views: 73