कुरूम येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कुरूम- कुरूम येथे येथे अण्णा भाऊ साठे नगर येथे अण्णा भाऊ साठे यांची १०४ वि जयंती साजरी करण्यात आली* या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ सविता जोतिबा माहुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अकोला जिल्हा सचिव भाजपा बाबुभाऊ देशमुख, ग्राम पंचायत सदस्य शैलेशमहाराज जावरकर, गोपाल मालवे, सुनील पवार, महेंद्र गुल्हाने, जीवन इंगोले, गोपाल भावेकर,सर्व सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून हाराअर्पण करण्यात आले. अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे ईश्वरदास इंगोले, मनोज इंगोले,संतोष इंगोले, श्रावण इंगोले,अजय इंगोले,मनोज अंभोरे,अमित डोंगरदिवे, विक्की इंगोले, व उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,
Post Views: 221