ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग निर्मूलन समित्या स्थापन करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Aug 2024, 8:34 PM
   

अकोला : क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग निर्मूलन समित्या स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी फोरम व कोमॉर्बिडिटी सभा मंगळवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, शहर क्षयरोगअधिकारी डॉ. निखिल लहाने आदी उपस्थित होते. 
> जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, क्षयरोगाने झालेल्या मृत्यूंची माहिती संकलित करून  ‘डेथ ऑडिट’ तयार करावे. क्षयरोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर टीबी फोरम स्थापण्यात यावा. गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, खासगी औषध विक्रेते यांना माहिती देऊन त्यांचा सहभाग मिळवावा. क्षयरोगमुक्त अभियानासाठी सर्व वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते यांचा महत्वाचा आहे. सर्व क्षयरूग्णांची एचआयव्ही, मधुमेह व इतर सर्व तपासण्या तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी दिले. 
शेड्युल एच 1 अंतर्गत क्षयरोग ड्रग विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी रुग्णांची नोंद ठेवून आरोग्य विभागास त्याबाबत दरमहा माहिती सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंत उन्हाळे, कपिल होळकर, उमेश पदमने,  हेमंत भाकरे  यांचे सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ. राधा जोगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री भुईवर, पियूष गुप्ता, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव , डॉ. सुधीर कराळे, डॉ. रवींद्र आर्य, डॉ. सालफडे, डॉ. जगदीश बनसोडे डॉ. श्रद्धा राऊत, डॉ. जगदीश खांदेतोड, अरुंधती शिरसाठ यांच्यासह गुणवंत शिक्षण संस्था , एन ए पी प्लस संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

    Post Views:  154


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व