भगतपुरा पारस येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2024, 6:35 PM
   

अकोला- अकोला जिल्ह्यातील रक्ताचा तुटवला बघता गणेश उत्सवा निमित्ताने गरजू रुग्णांकरिता जय हनुमान गणेश उत्सव मंडळ भगत पुरा, यांच्यातर्फे पारस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सौरभ वाघोडे, संतोष दांदडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली. व रक्तदात्यांना गावातील नागरिकांना युवा वक्ते सौरभ वाघोडे यांनी रक्तदानाचे फायदे आणि रक्तदानाची गरज काय समजून सांगितले. या जगात रक्तदाणा पेक्षा श्रेष्ठ दान दुसरे नसून आपण रक्तदान करून गरजुं रुग्णांचे प्राण वाचवू शकता असे प्रतिपादन सौरभ वाघोडे यांनी केले तर या शिबिरा मध्ये कुलदीप काळपांडे, गोपाल दांदळे, तेजस मेश्राम, शुभम सरोदे, अक्षय ठाकरे, सोमेश्वर करंजेकर, विवेक सोनवणे, मनोज लांडे, महेश लांडे, शिवदीप लांडे, विजय आढाव,शकुल राऊत, विशाल तायडे, नागेश सोळंके, भूषण दांदळे, घनश्याम सातव, अभिषेक लांडे, सुहास खंडारे, ओम अथरवे,प्रतीक हिवराळे, नंदकिशोर वैराळे, दीपक दवे, अश्वजीत खंडारे, अक्षय भगत, सय्यद रहमान, अभिषेक तायडे, अहसान पटेल अश्या ६३ रक्तदात्यानी रक्तदान केले. कार्यक्रमाचे आयोजन अनुराग काळपांडे, शुभम सरोदे प्रणव भगत,विशाल दांदळे,शुभम दांदळे ,अभी दांदळे,आदित्य सोळंके ,दीपक ताले,ओम् भगत,हर्षल सोळंके,सोपान वऱ्हाडे,विवेक मिटकरी,अनुराग भगत,कुलदिल कळपांडे,गणेश भगत,सोहम कारंजकर,तुषार कारंजकर,गौरव सोळंके जय हनुमान मित्र मंडळ भगत पुरा,पारस यांनी केले.

    Post Views:  161


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व