अकोला जिल्ह्यात चार कुष्ठरोग समुपदेशन केंद्र, कार्यान्वित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Nov 2024, 9:48 AM
अकोला - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रुग्ण शोधण्याचे तसेच उपचार देण्याचे कार्य केले जाते. जिल्ह्यामधे एकूण सात तालुके असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ग्रामीण भागात कुष्ठरोगाविषयी प्रभावी जनजागृती करणे,प्राथमिक अवस्थेत नवीन रुग्ण शोधून त्यांना तात्काळ उपचाराखली आणणे, तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकौपचार साहित्याचा लाभ देण्याचे कार्य सार्वजनिक आरोग्य सेवतेतील कर्मचारी व आशा करत असतात. तसेच रोगप्रतिकृया ,जोखमीचे व्रण शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्ण यांना समुपदेशन केंद्रात बोलाऊन तज्ञा मार्फत तपासणी करून उपचार दिले जातात.त्याउद्देशने जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महा विद्यालय,अकोला, ओपिडी क्र ११८/११९ ग्रामीण रुग्णालय,अकोट,उपजिल्हा रुग्णालय,मूर्तिजापूर आणि ग्रामीण रुग्णालय,बाळापूर या ४ ठिकाणी शासनाने समुपदेशन केंद्र कार्यान्वित केले असून तेथे रुग्णांना निदान. व बहुविध उपचार,रोगप्रतिक्रिया उपचार जखमा वरील उपचार, व्यक्स बाथ,नर्व्ह र्स्टीमुलेशन सर्व प्रकारचे उपचार वैदिकिय पुनर्वसनाच्या दृष्टीने एम्सीआर चपल,सेल्फ केर किट गॉगल व फिंगरलुप्स इत्यादी आवश्यक साहित्याचा निःशुल्क लाभ दिला जातो,तसेच पडतळणी व समुपदेशन देऊन प्रवृत्त करून शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केले जाते. सदर कामाचा मार्गदर्शन व आढावा राज्यस्तरावरून सह संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे तसेच मां उप संचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला ,तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी ,जील्हा शल्य चिकित्सक हे नियमित घेत असतात. रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी तालुका आरोग्य अधिकारी,वैदकिय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी अशा गुंतागुंत असलेल्या रुग्णांना संदर्भित करावे तसेच रुग्णांनी सुधा आपल्याला जवळ असेल त्या संदर्भ सेवा केंद्रात भेट देऊन सेवांचां लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.दिलीप रनमले सहायक संचालक (कुष्ठरोग) यांनी केले आहे.
Post Views: 173