कोविड वॅक्सिंन बद्दल जनजागृती करून जिव्हाळाने जोपासली सामाजिक बांधीलकी-डॉ ओळंबे
अकोला : स्थानिक जोगळेकर प्लाट डाबकी रोड येथे जिव्हाळा बहुउधयेशीय संस्थेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये महिलांच्या आरोग्यासंबंधी असलेल्या समस्या व त्याचे निराकरण,आगामी येणाऱ्या आमेक्रॉंनचे संकट व कोविड १९ वॅक्सिंन संबधी जनजागृती व मार्गदर्शन भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी केले,ज्यामध्ये गेली २ वर्ष कोविड १९ मुळे भीतीचे वातावरण होते,कोरोनामुळे बऱ्याच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले,आज सुध्दा ज्यांना कोविड होउन गेला त्यांची व्यथा वेगळी असून नागरिकांनी गाफील न राहता मास्क वापरणे,वारंवार हात धुणे,डिस्टनसिंगचा वापर करणे,गर्दी टाळणे आवश्यक असून आपली,आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.त्यासाठी महिलांनी वेळीच सावध राहून ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी दोन्ही डोज घेणे गरजेचे आहे,नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या परिसरातील,परिवारातील,परिचित महिलांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना लस घेण्यास सांगावे जेणेकरून आमेक्रॉंनचे(कोरोना विषाणू)चे येणारे संकट आपण टाळू शकतो,तसेच ज्यांचे घरातील व्यक्ती कोविडमुळे मृत पावला असेल त्यांना शासनाची ५० हजाराची मदत मिळून देणे हे आपले कर्तव्य असून महिलांनी या कामी पुढाकार घ्यावा असे आव्हान यावेळी डॉ अशोक ओळंबे यांनी केले.यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालय येथील आहार तज्ञा सौ अंजली इंगळे यांनी महिलांनी आपल्या चांगल्या स्व।स्थासाठी कुठला आहार घ्यावा याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका देशमुख यांनी केले,संचालन सौ हेमा देशमुख यांनी प्रास्ताविक सौ अलका देशमुख तर महिलांचे व मान्यवरांचे आभार सौ तारताई गोलाईत यांनी मानले,कार्यक्रमाला गजानन गोलाईत,राजाभाऊ देशमुख सौ मीराताई वानखडे,सौ संगीता मांगटे,सौ नीलिमा तिजारे यांचेसह बहु संख्येने महिलांची उपस्थिती होती.
Post Views: 263