कौलखेड येथे शेजारी महिला गृप तर्फे हळदीकुंकू स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Feb 2025, 9:09 AM
अकोला : येथील जुने खेतान नगर, कौलखेड येथे भव्य दिव्य प्रांगणात शेजारी महिलागृपच्या वतीने परिसरातील महिलांना एकत्र आणून भव्य-दिव्य हळदीकुंकू कार्यक्रम व महिला स्नेहसंमेलन संध्याकाळी ७ वा. ४ फेब्रुवारीला उत्साहात पार पडले. शेजारीगृपच्या अल्पना गडलिंगे यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना साकारण्यात आली. शेजारी गृप,YES wE ARE FAMILY च्या वतीने हळदी कुंक कार्यक्रम व महिला संमेलनाचे आयोजन करून त्यांना हळदीकुंकू कार्यक्रमात वाण देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. समस्त महिलांनी आनंदोत्सव साजरा केला,हळदीकुंकू कार्यक्रमा निमित्त व स्नेहसंमेलनानिमित्त बहारदार उखाणे, रिल्स टाइल्स, गायनस्पर्धा, नृत्याचे सादरीकरण करून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे खेळ उत्साहात पार पडले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सौ. अल्पना विजयकुमार गडलिंगे, भावना जोशी, तृप्ती बदरखे, मनीषा तामसे, पूजा साळुंके, सोनू चौधरी, हर्षा काळे, वीणा मंत्री, वर्षा माहोरे, शीतल कनोजिया, मनिषा चौधरी, सुषमा सबनीस ह्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी कौलखेड, न्यु खेतान नगर, जिजाऊ कॉलनी, वर्धमान नगर, आयटीआय कॉलनी, समता कॉलनी आजूबाजूच्या परिसरातील हजारो स्त्रियांची उपस्थिती लाभली होती. यापुढेही ‘शेजारी सार्वजनिक वाचनालय’, शेजारी योगा वेंâद्र,शेजारी कराओके गृप, शेजारी जेस्टासाठी टॅ्रक, व या जागेचे सौंदर्यीकरण करण्याचे या ‘शेजारी’ गृपचा मनोदय आहे.
Post Views: 65