शेतकऱ्यांकडून कमी भावाने घेऊन ईतरांना महागात विकणाऱ्या व्यापाऱ्यांची विश्वासघात की चंगळ थांबविली पाहिजे!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Feb 2025, 9:00 AM
जिल्हा प्रतिनिधी : वैभव हराळ
श्रीगोंदा - फळ भाज्यांचे दर वेगाने, क्रमाने वाढतच चालले आहेत. अती महागाईने नोकरदार वर्ग त्रस्त झाला असून व्यापाऱ्यांची चंगळ होत असल्याचे समोर येत आहे. तरी सर्व फळ भाज्यांचे कमी दराने प्रमाणात मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांची सकस आहाराची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांना कवडीच्या भाव देऊन व्यापारी फसवणूक करून मार्केट गाजवत आहेत. एकीकडे शेती औषधे महाग हा कुठला उपक्रम शासन राबवत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव या व्यापाऱ्यांनी दिला पाहिजे. शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करणाऱ्या दलालांना चाप बसला पाहिजे, अहील्यानागर येथील सर्व परिसरावर भरपूर फळ भाज्यांचे विक्रेते मनाला वाटेल अशा दराने विक्री करतात. यांनी माफक भावाच्या सुचना द्याव्यात. जर खाण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ असेल तर हे पाकिस्तानी दिवाळं ठरेल.
Post Views: 69