नीलेश देव मित्र मंडळाने राबविला मोहल्ला क्लिनिंग दुसरा टप्पाचे अभियान
प्लास्टिकमुक्त अकोल्याचा संदेश: खरप भागातील नागरिकांना मच्छिर मुक्ती साठी वितरण केले शौचालय पाईपाच्य
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Feb 2025, 9:39 AM
अकोला : ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने व महापालिकेच्या सहकार्याने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोहल्ला क्लिनिंग अभियानातर्गंत १९ जानेवारी पहिल्या टप्प्यात जठार पेठ भागात राबविण्यात आला होता आज दुसरा टप्पा दि. १६ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ७.३० वाजतापासून ते संध्याकाळी ३.०० वाजेपर्यंत हद्दवाढ भागातील खरप बु.च्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी १२५ स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेत, ठिकठिकाणी रस्ते, नाल्या साफ केल्या.
स्वच्छ व सुंदर अकोला शहराचे स्वप्न साकार करणे हे केवळ महानगरपालिकेचीच जबाबदारी नाहीतर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या दृष्टीकोनातून ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाने रविवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या स्वच्छता विभाग व पुर्व झोन कार्यालयाच्या सहकार्याने मोहल्ला क्लिनिंग अभियान राबविले. मागील ७ वर्षीनंतर खरप येथील स्मशानभूमीची स्वच्छ मोहिम. जेसीबी खाली भुखंड स्वच्छ करण्यात आले. फवारणी यंत्राच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांनी रस्ते, नाल्या साफ केल्या. अनेक ठिकाणी कचरा उचलून घंटागाडीमध्ये टाकण्यात आला. या उपक्रमात निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख निलेश देव यांच्यासह ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, मनपा पुर्व झोनचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, मनपा आरोग्य विभाग प्रमुख संजय खोसे, प्रविण मनोहर आरोग्य निरीक्षक, रश्मी देव, वंचीत जेष्ठ नेते मनोहरराव बनसोड, युवा नेते सुगत तायडे, जगन्नाथ इंगळे राजू नागे, शवानंद इंगळे चंद्रशेखर इंगळे ,राजू इंगळे, विलास बनसोड, पारणाथ इंगळे योगेश कंकाळे, राम चाहाकर, वैभव इंगळे, निलेश बनसोड, धम्मा जामनिक, अवंतिका मैराळ, राजेंद्र गुणल्लवार, प्रकाश जोशी, राजु भाऊ कनोजिया,अजय शास्त्री, रामहरी डांगे, रविंद्र मेश्राम, राजु कनोजिया, विजय वाघ, शैलेश देव, गणेश मैराळ आशु यादव, निलेश दुधलम, बबलु तिवारी आदी उपस्थित होते. स्वच्छ अकोला सुंदर अकोला शहराची संकल्पना पुर्णत्वास नेण्याच्या व वाढत्या मच्छर वर मात करण्यासाठी खरप येथील प्रत्येक घरी शौचालय पाईपाला मच्छर मुक्ती जाळी वाटप करुन याबाबत जगजागृती केली दृष्टीकोनातून नीलेश देव मित्र मंडळ वतीने केली.
Post Views: 90