डॉ.मनोहर घुगे लिखित अक्षरेच माझे सांगाती या चारोळी संग्रहाचे विमोचन संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 May 2025, 9:31 AM
   

अकोला-  प्रतिनिधी स्थानिक अकोला वाशिम बायपास येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक समाजसेवक डॉक्टर मनोहर घुगे लिखित अक्षरेच माझे सांगाती या चारोळी संग्रहाचे विमोचन नुकतेच पातुर येथे पार पडलेल्या 62वे अखिल भारतीय अकुर मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे  माझी शिक्षण मंत्री तथा माजी पालकमंत्री श्री वसंतराव पुरके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी विचार पिठावर संमेलना अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे प्राचार्य रमेश अंधारे सदाशिव शेळके स्वागत अध्यक्ष नारायणराव अंधारे  पुष्पराज गावंडे अंकुर चे अध्यक्ष हिम्मत ढाळे  सिन्हा  महाविद्यालयाचे प्राचार्य किरण खंडारे आदींची विचारपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कावरे यांनी तर आभार सुनील  दिवणाले यांनी मानले. डॉक्टर मनोहर घुगे यांचे आतापर्यंत एकूण चार पुस्तके प्रकाशित असून त्यांना विविध संस्थेच्या वतीने शंभराच्या वर पुरस्कार प्राप्त आहेत. हे विशेष. सामाजिक प्रेम विरह शेतकरी आदि विषयावरच्या चारोळ्या या पुस्तकात समावेश केलेला असून रसिकांना त्या आकर्षित करतात.

    Post Views:  53


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व