संस्थापक अध्यक्ष विजयकुमार गडलींगे यांचे मार्गदर्शनात शेजारी फाऊंडेशनने केला योगा दिन साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Jun 2025, 8:35 AM
अकोला : येथील जुने खेतान नगर स्थित फिट अँड फाईन वेलनेस फॅमिली व शेजारी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शेजारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे यंचे मार्गदर्शनामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी फीट अँड फाईन वेलनेस फॅमिलीच्या संचालिका वृषाली पवार यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला आणि नियमित व्यायाम,सकस संतुलित आहार यांचा वापर जीवनशैलीत बदल केल्यास आपण वेगवेगळ्या आजारावर कशा प्रकारे मात करू शकतो याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शेजारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे, राजू देशमुख, निलेश पवार, अल्पना गडलिंगे, भावना जोशी, वर्षा सरजोशी, हर्षा काळे, विना मंत्री, शीतल कनोजिया,गायत्री जडी, सोनू चौधरी,उषा पवार आदी उपस्थित होते सर्वांनी दररोज स्वतःसाठी एक तास देऊन योग करण्याचा संकल्प केला व आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, असे पंजाबराव वर यांनी कळविले.
Post Views: 49