राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षणात अकोल्याचा गौरव देशमुख ठरला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी!


९ महिण्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर २ मेडलसह दिक्षांत समारंभात सन्मानित...! अकोल्याचे वैभव
 विश्वप्रभात  2025-07-07
   

अकोला -- राज्य राखीव पोलीस दलाच्या कठोर प्रशिक्षणात सर्व बाजूंनी नैपुण्य प्राप्त करणाऱ्या अकोला येथील गौरव संजयराव देशमुख याने राज्यातील २१५ प्रशिक्षणार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीं म्हणून बहूमान मिळविला आहे, कठोर मेहनत करण्याची तयारी,सोजन्न्यशील वृत्ती,सेवाभाव आणि स्नेहशील संबंध ठेवण्याच्या कौशल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचा प्रिय प्रशिक्षणार्थी ठरण्याची आणि एक गौरवाची आणखी एक किनार गौरवने आपल्या प्राप्त यशासोबत जोडून ठेवली आहे.
      राज्य राखीव पोलीस दलातील त्याच्या उल्लेखनिय यशस्वी सहभागाबध्दल त्याला दिक्षांत समारंभात दोन मेडल आणि रेजिमेंटल केन प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याला राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथे नियुक्ती देण्यात आली आहे.राज्य राखीव पोलीस दलाच्या नवप्रविष्ठ पोलीस शिपायांचा दिक्षांत समारोह छत्रपती संभाजी नगर येथील प्रशिक्षण केन्द्रात संपन्न झाला. राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक श्री.राजकुमार व्हटकर  यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.तर विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली,नागपूर,पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय)मोक्षदा पाटील, मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर,पुणे परीक्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
       गौरव देशमुख हा आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनाचाराविरूध्द संघर्ष आणि जागृतीचे कार्य करणारे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या  सामाजिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व देशमुख समाजाचे सामाजिक  कार्यकर्ते संजयबाप्पू कृष्णराव देशमुख( कंझारेकर )यांचा मुलगा आहे.त्याच्या यशाबध्दल त्याच्या मित्रमंडळीकडून आणि समाजातील अनेक मान्यवर,आणि हियचिंतक स्नेहीजणांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Post Views:  29


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख