अकोला : पहाटेच्या वेळेला रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला स्विफ्ट कारखाली चिरडणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गंगानगर बायपास येथून रस्ता ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या कडेला जात असणाऱ्या 87 वर्षीय वृद्ध महिलेला स्विफ्ट कारचालकाने आपल्या गाडीखाली चिरडले होते . त्यानंतर सदर कारचा चालक सोहेराव खान रुस्तम खान राहणार जुने शहर अकोला वय 45 याला जुने शहर पोलीस अधिकारी मीना देशमुख यांनी कारसह ताब्यात घेतले होते . त्यानंतर सदर गंभीर जखमी वृद्ध महिलेचे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले . त्यानंतर मेंदूला जबर मार लागल्याने अतिरिक्त उपचारासाठी वृद्ध महिलेला नागपूरकडे पाठविण्यात आले असताना सदर महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला . त्यानंतर आरोपीवर जुने शहर पोलिसांनी भांदवी कलम 279, 337 आणि मोटर व्हेहिकल ॲक्ट कलम 184 नुसार गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपी खान याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने आरोपीचे विधीज्ञ संजय कमल अशोक देशमुख, विधीज्ञ अभिषेक आराधना रमेशचंद्र गौतम आणि विधीज्ञ शोएब शेख यांनी विद्यमान ६वे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी पी.डी.पाटील साहेब यांच्या न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करून आरोपीला जामीन मिळवून दिला.
Connection failed: Operation not permitted