ग्रा.पं. येळवण येथे विविध विकास कामाचे आ.सावरकर यांचे हस्ते भूमिपूजन
येळवण : आज दिनांक 10/10/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता ग्रामपंचायत येळवण येथे आ.रणधीर सावरकर अकोला पूर्व यांनी केलेल्या प्रयत्नाने एकूण 87 लाख 25 हजार निधीमधून ग्राम पंचायत येळवण येथे विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जात जमातीसाठी समाज मंदिर बांधकाम, अंगणवाडी बांधकाम , स्वतंत्र विद्युत पोलसह, स्ट्रीट लाईट, शेत पानंद रस्ते वृक्षारोपण, ग्रामपंचायत विकास कामाचे पुस्तकाचे प्रकाशन इत्यादी कामे व त्या कामाचे भूमिपूजन आ.रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये येळवण गावचे सरपंच काजल दिनेश मडावी, उपसरपंच आम्रपाली वाहूरवाघ , ग्रामपंचायत सदस्य वेणूताई चोरपगार, नंदा कुंबरे ,नंदा सोनवणे, अनिल मोहिते, शेषराव शिंदे, निरंजन गडलिंग, सामाजिक कार्यकर्ते मंदाताई देशमुख, राजेश बापू देशमुख, डीएम गडलिंग, नाजुकराव चौरपगार तुकाराम पडघन ,मधुकर पडगवार, ग्रामपंचायत अधिकारी गणेश शिरसाठ, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील असंख्य नागरिक सदर कार्यक्रमाकरिता हजर होतेे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काळे यांनी केले.
Post Views: 91