अकोला : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सार्वजनिक सुट्टी असली तरीही भारतीय स्टेट बँक, कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालये मंगळवारी (३१ मार्च) सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. आर्थिक वर्षातील ३१ मार्च हा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी महावीरजयंतीची सार्वजनिक सुट्टी आहे. मार्चअखेरीस शासनाचा निधी अखर्चित राहू नये व शासनाच्या जमा-खर्चाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व त्याचरोजी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँक, कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती मीना दिले आहेत.
Post Views: 7