नागपूर येथील निर्मल बुद्ध विहारात पंजाबराव वर सन्मानित


मनोगतातून उलगडला त्यागमय रमाईचा जीवनपट
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Apr 2026, 8:21 AM
   

अकोला - महामाता रमाईच्या अपार त्यागातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवपदी विराजमान होऊ शकले व त्यांनी संविधानाचे माध्यमातून महिलांना समानतेता अधिकार दिल्याने भारतातील  महिलांवर आंबेडकरांचे अनंत असे उपकार असल्याचे प्रतिपादन गाथा रमाईकार तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून नारा रोड नागपूर येथील निर्मल बुद्ध विहारात सत्कारपर बोलतांना व्यक्त कले. त्यांनी त्यागमय रमाईचा संपुर्ण जीवनपट यावेळी कथन केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिद्धार्थ डहाट होते तर प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक पंजाबराव वर यांचा नुकताच ‘गाथा रमाईची’ हा चरित्र ग्रंथ प्रकाशित झाल्याने सत्काराचे आयोजन केले होते. त्यांच्या अर्धांगिणी सुनंदाताई वर दोन्ही उभयतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी  कार्यक्रमाला  सुनंदाताई खांडेकर,सहारे ताई,  वर्षाताई चावरे, प्राचीताई चावरे, रेखाताई गजभिये, निर्मलाताई पटवर्धन, पंचशिला पाटील, आशा डहाट, मंजू डहाट, प्रमिला चावरे,  लोखंडे लाई, करूणा मेश्राम, अर्चना टेंभुर्णे, श्वेता फुलझेले, अंतकला मेश्राम, प्रियदर्शनी मेश्राम, ममता कडबे, नरेश पिल्लेवान, सिद्धार्थ डहाट,  तेजस मेश्राम, नरेश टेंभुर्णे, भीमराव पाटील, अरविंद कडबे, सुभाष फुलझेले, अशोक लोणारे, अनिल मेश्राम, राजविलास चंद्रिकापूरे, मोहन कडपे, कावरेभाऊ, हरेंद्र गणविर, मनोहर चवरे,  रिषभ लोखंडे, लिलावंती पाटील आदींची उपस्थिती होती!  समस्त महिला संघाने 'गाथा रमाईची' ग्रंथ विकत घेवून रमाईचा आदर्श घेण्याचे अभिवचन दिले. प्रास्ताविक सिद्धार्थ  डहाट यांनी केले तसेच कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुभाष फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन तेजस मेश्राम यांनी मानले.

    Post Views:  19


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व