विरोधकांच्या प्रतिकात्मक सभेत सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली
भ्रष्टाचारासह मनमानीचा केला आरोप, विविध ठरावही केले मंजूर
अकोला - महापालिकेत विरोधी गटातील १६ नगरसेवकांच्या निलंबनांतनंतर शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी झालेल्या सभेवर बहिष्कार टाकून विरोधी गटाने विरोधी पक्षनेत्याच्या कक्षासमोर प्रतिकात्मक सभा घेतली. विरोधी गटाच्या या प्रतिकात्मक सभेत सत्ताधारी गटाची चांगलीच खिल्ली उडवली तसेच सत्ताधाºयांवर भ्रष्टाचारासह मनमानी कारभाराचा आरोप करुन १६ नगरसेवकांचे केलेले निलंबन मागे घेतले. सत्ताधारी गटाच्या सभेपेक्षा विरोधकांनी घेतलेल्या या प्रतिकात्मक सभेची शहरात जोरदार चर्चा झाली.
विरोधकांनी घेतलेल्या प्रतिकात्मक सभेत महापौरपदी कॉग्रेसच्या निलोफर खान यांची तर उपमहापौरपदी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते डॉ.जिशान हुसेन यांनी नगर सचिवांची भूमिका पार पाडली. या प्रतिकात्मक सभेत प्रथम १६ नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी प्रतिकात्मक महापौर निलोफर खान यांनी मंजुर केली. वंचितचे सुनिल इन्नाणी यांनी घरकुलासाठी कंपनी नेमण्याचा घाट केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी घातला. मात्र आम्ही खिरापत वाटू देणार नाही. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तर निलेश देव यांनी या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करुन शुन्य कन्सलटन्सीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात आले. वंचितचे गटनेता निलेश देव, उबाठाचे गटनेता विजय इंगळे यांनी कचरा घंटागाडीचा मुद्दा उपस्थित केला. कचरा घंटागाडीसाठी नागरिकांकडून दरमहा पैसे घेतले जातात तसेच महापालिकेकडून दरमहा २७ लाख रुपये दिले जातात. ही लुट कंत्राटदाराच्या आड भ्रष्टाचार करुन स्वत:चा फायदा करुन घेण्यासाठी केली जात असल्याचा आरोप करुन कचरा घंटागाडी मोफत करण्याची मागणी केली. निलेश देव म्हणाले, प्रत्येक गोष्टीसाठी अभिकर्ता नियुक्त केला जातो मग महापौर कसा असावा यासाठी देखिल अभिकर्ता नेमा, टॉवर विकण्यासाठी अभिकर्ता नेमा अशी मागणी केली. डॉ.जिशान हुसेन म्हणाले, सत्ताधारी गटाकडून पत्रकारांना सभागृहात बसु न देण्याचा प्रस्ताव आला होता. कारण सभागृहात चालणाºया कामकाजाचे खरे चित्र नागरिकांसमोर येवू नये, यासाठी हा घाट होता. मात्र आमच्या प्रतिकात्मक सभेत आम्ही पत्रकारांसाठी जागा राखीव ठेवली आहे. सभेत प्रिया शिरसाट, पराग गवई, निलेश देव, विजय इंगळे यांनी निधी वाटपात भेदभाव न करता सर्व नगरसेवकांना समान निधीचे वाटप करण्याची मागणी रेटून धरली.
--------------
सभेत वृत्तपत्र प्रतिनिधींचा मुद्दा
विरोधी गटाने घेतलेल्या प्रतिकात्मक सभेत डॉ.जिशान हुसेन,निलेश देव , शाहिन अंजूम, आकाश कवडे, मुसा, पराग गवई यांनी वृत्तपत्र प्रतिनिधी हे सभेचा जीव आहेत, २५ वर्षात प्रथम पत्रकारांसाठी जागा कमी पडली. जागा कमी पडत असेल तर नियोजन भवनात सभा घेण्यात यावी. एव्हढे पैसे खर्च केले जातात मग नियोजन भवनासाठी दहा हजार रुपये खर्च न करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला.
------------------
सत्ताधाºयांची उडवली खिल्ली
विरोधकांच्या प्रतिकात्मक सभेत सत्ताधारी गटाची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. सभागृहाचे कामकाज कसे मनमानी पद्धतीने चालते, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच महापौर यांच्यापेक्षा इतर नेते सभागृहाचे कामकाज कसे चालते, याचे उदाहरण देण्यासाठी महापौरांनी निर्णय घेण्यापूर्वी त्यांना चिठ्ठी देण्यात आली. तसेच विरोध केल्या नंतर संबंधित नगरसेवकाला पडीत वॉर्ड देण्याचे आश्वासन या सभेत देण्यात आले.
---------------
तर आमच्या भागाचा कर कमी घ्या
निधी कोणताही असो, तो निधी खºया अर्थाने जनतेचा असतो. या निधीचे वाटप करताना भेदभाव का केला जातो. जर विरोधकांना कमी निधी दिला जात असेल तर विरोधकांच्या प्रभागातील मालमत्ता कर ही कमी घेण्यात यावा, अशी मागणी उबाठाचे गटनेता विजय इंगळे यांनी केली.
Post Views: 29