डॉ मनोहर घुगे सम्राट अशोक वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानीत
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
29 Apr 2026, 7:28 PM
अकोला : गेल्या २५ वर्षापासुन गोरगरिबाची निस्वार्थपणे सेवा करीत मानवतेचा दिप प्रज्वलित ठेवणारे अकोल्यातील ख्यातनाम समाजसेवी साहित्यिक कवी डॉ मनोहर घुगे यांना या वर्षीचा सम्राट अशोक वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉ मनोहर घुगे यांनी गोरगरीबासाठी विविध भागामध्ये आरोग्य शिबीर राबवून मोफत औषधी वाटप केले अनेक वर्षों पासून समाज कार्य करीत आहेत त्यांचे साहित्य सुध्दा समाज प्रबोधनाचे आहे त्यांच्या साहित्याची दखल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेतली आहे.
आज दि २९/४/२०२६रोजी आबासाहेब खेडकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार धिरज लिंगाडे किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय नेते प्रकाशभाऊ पोहरे सुप्रसिद्ध समाजसेवी संतोष हुशे डॉ रणजीत कोरडे प्रा बाळकृष्ण खंडारे प्रा सुनिल कांबळे प्रा विजय आठवले यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह देऊन डॉ मनोहर घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views: 14