निस्वार्थ रुग्णसेवा बहुउद्देशीय संस्था यांचा 3 रा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Jun 2026, 7:38 PM
   

निस्वार्थ रुग्णसेवा परिवार बहुउद्देशीय संस्था अकोला महा.राज्य यांचा ३ रा वर्धापन दिनानिमित्त दि.१५/०६/२०२६ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,शासकीय (GMC)  रुग्णालय अकोला येथील रुग्णांसाठी २० किलो खिचडी व बर्फी वाटप तसेच सूर्योदय बालगृह मलकापूर येथील अनाथ मुलांसाठी शालेय वस्तू नाष्टा व आईस्क्रीम चे वाटप करण्यात आला आणि प्रणव इंगळे दहावी (१० वी उत्तीर्ण), हरीश कालमेघ (१२ वी उत्तीर्ण), सेजल सुलताने (१० वी उत्तीर्ण), सानिध्य देशमुख (१० वी उत्तीर्ण) या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांच्या राहता घरी खडकी इथे निस्वार्थ रुग्णसेवा बहुउद्देशीय संस्था तर्फे करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रभाग क्रमांक 20 चे स्वीकृत नगरसेवक मा.श्री.शंकर मामा लंगोटे,श्री. नगरसेवक श्री.विजु भाऊ इंगळे, श्री.रवींद्र दादा हुंडीवाले,प्रा.डॉ.रोहित काळे,डॉ.रमेश पाटणकर,समाजसेविका सौ.सविता ताई अढाऊ,सविता ताई शेळके, विशाल गुंजाळे,संतोष भाऊ क्षीरसागर (ता.सचिव बार्शीटाकळी शिवसेना शिंदे गट),आदित्य भाऊ ठाकूर (युवासेना सचिव शिंदे गट),डॉ.सायली ताई धामणस्कर,सौ‌. माया मेंढे,श्री.संतोष दादा चिलवंते (जिल्हा उपाध्यक्ष निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महा.राज्य),रुग्णसेवक श्री.सुरेश भाऊ खंडारे,डॉ.अतुल दादा भांगे (संस्थापक सचिव निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महा.राज्य),सचिन सातपुते, गणेश निरगुडे,ज्ञानेश्वर दादा वाघमारे,यश भाऊ गिरे,शुभम भाऊ शेळके,भूषण भाऊ शिंदे,बुद्धी सागर आदींची उपस्थिती होती व मोठ्या प्रमाणात संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

    Post Views:  80


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व