पर्यावरणप्रेमी बालकलाकार स्वराज सोसेचा अकोला मनपा कार्यशाळेत विशेष सन्मान
शेकडो विद्यार्थ्यांसमोर ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ लघुचित्रपटाचे प्रदर्शन; अभिनयासह पर्यावरण संव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 Sep 2026, 9:45 AM
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत पर्यावरणप्रेमी बालकलाकार चि. स्वराज दीपाली आतिश सोसे याला विशेष निमंत्रित करून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वराजने अभिनय केलेल्या ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ या लघुचित्रपटाचे उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रदर्शन करण्यात आले.
अकोला महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या भव्य कार्यशाळेत शहरातील सुमारे १० ते १२ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने,महापौर शारदाताई खेडकर, दक्षिण झोन सभापती पूजाताई गावंडे, नगरसेविका सोनालीताई अंधारे,नगरसेविका योगिताताई पावसाळे, नगरसेविका आरतीताई घोगलिया, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार, सहाय्यक आयुक्त देविदास निकाळजे, पर्यावरण विभाग प्रमुख अनिल बिडवे, गणेश मूर्ती प्रशिक्षक अमृता शेनाड यांच्यास यांच्यासह विविध अधिकारी, शिक्षक,पालक आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी स्वराज सोसे याने साकारलेल्या ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ या लघुचित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वराजच्या अभिनयाचे तसेच त्याच्या पर्यावरणविषयक कार्याचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणप्रेमी बालकलाकार स्वराज सोसे याचा विशेष सन्मान करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसमोर त्याच्या कार्याचे कौतुक झाल्याने स्वराजच्या पर्यावरणविषयक उपक्रमाला आणखी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
अभिनय, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या स्वराज सोसेच्या या उपक्रमाचे अकोला शहरात विशेष कौतुक होत आहे.
Post Views: 8