नवी दिल्ली : बदलती जीवनशैली आणि आहार पद्धतीमधील बदलामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने अनेकांना ग्रासले आहे. हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा अधिक हवेहवेसे वाटते. मात्र, संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त व्यक्तींना हिवाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांनी हिवाळ्यात पुरेश्या प्रमाणात काळजी न घेतल्यास उबदार वाटणारा हिवाळा अपायकारक ठरू शकतो.
हिवाळ्यात तापमानाचा पारा घसरतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग मंदावण्याची शक्यता अधिक असते. शरीराला आवश्यक असणारी उष्णता योग्य प्रमाणात मिळत नाही. उच्च रक्तदाबाची समस्या हिवाळ्यात अधिक प्रमाणात भेडसावते. केवळ रक्तदाबाच्या पातळीत वाढ न होता त्यासंबंधित अन्य जटिल समस्या देखील उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंन्शनचे प्राथमिक अवस्थेतच निदान होणे महत्वाचे ठरते. प्राथमिक टप्प्यांत लक्षणे समजत नाही किंवा उशीराने निदान होते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वेळी उपचार घेतल्यास भविष्यातील समस्या टाळणे शक्य ठरते.
उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत अलीकडच्या काळात भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत युवकांनाही रक्त दाबाच्या समस्यांनी ग्रासले आहे. जीवनशैलीतील बदलामुळे भेडसावणारा विकार आहे. जीवनशैलीतील अनुरुप बदलांद्वारे उच्च रक्तदाबाच्या विकारावर मात करणे सहज शक्य ठरते.
>> नियमित रक्तदाबाची तपासणी
>> नियमित अंतराने वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला
>> पोषक आहाराचे सेवन
>> नियमित स्वरुपात व्यायाम. अधिक शारिरीक श्रमाचे व्यायामप्रकार टाळा. तज्ज्ञाच्या हजेरीत वर्कआऊट करा.
>> थेट सूर्यप्रकाशात किंवा अति थंडीत अधिक वेळ बाहेर राहणे टाळा किंवा स्वत: च्या सुरक्षेची खबरदारी घ्या.
नियमित संतुलित आहाराच्या सेवनाला प्राधान्य द्या. ताज्या पालेभाज्या, फळे आणि कमी फॅटची दुग्धोत्पादने यांचा आहारात समावेश करा. तुमच्या आहारात मिठाचे विशिष्ट प्रमाण असणे आवश्यक ठरते. धान्ये (whole grains), सुका मेवा (Dry fruits), मासे (Fish), अंडे (Egg) आणि अन्य पोल्ट्री प्रॉडक्ट्स (poultry) यांचा आहारात नियमित स्वरुपात समावेश करा.
Post Views: 356
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay