देशमुख समाजाचा स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न
अकोला, दि 21: जिल्ह्यातील देशमुख समाज जागृती मंडळाचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा रविवारी अमानतपुर टाकोळा येथील शिवमंदिरात थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला देशमुख समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी समाजातील मागास लोकांना मदत करण्याचे ठरविण्यात आले.
समाजातील प्रगत घटकाने गरजुंना मदत करावी असे आवाहनही यावेळी आवर्जुन करण्यात आले. समाजाच्या संपत्तीचा आणि वलयाचा गैरफायदा घेणार्यास चांगलाच धडा शिकविला जाईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सोहळ्याला संजय कृ देशमुख, यावेळी के.व्ही. देशमुख डोंगरगावकर, प्रा.संजय देशमुख, विजय देशमुख, हरीश देशमुख, राजाभाऊ बा.देशमुख, एस.के. देशमुख झोडगेकर, अश्विन देशमुख, अंकुश देशमुख, यशवंत देशमुख, राजाभाऊ बेलोकार, रिधोरेकर देशमुख, सुजय देशमुख, अनिल देशमुख, राजेश देशमुख, अमोल देशमुख, पंकज देशमुख, संदीप देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, अभिषेक देशमुख, संजय कमल अशोक देशमुख या सह समाजातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या समाज बांधवांचा लवकरच जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात सत्कार घेण्याचे यावेळी घोषित करण्यात आले.
Post Views: 468