MPSCची दोन जानेवारीला होणारी परीक्षा ढकलली पुढे


 संजय देशमुख  28 Dec 2021, 8:49 PM
   

मुंबई : येत्या दोन जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलंय की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे.
MPSC ने एका पत्राद्वारे हे स्पष्ट केलंय. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

    Post Views:  329


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted