गांजाची अंगणात लागवड, 5.87 लाखांचा मुद्देमाल जप्त


60 किलो गांजा हस्तगत; विशेष पथकाची कारवाई
 संजय देशमुख  04 Jan 2022, 8:59 PM
   

अकोला : जिल्ह्यातील खेर्डा खुर्द येथे घराच्या अंगणात मादक पदार्थ गांजाची लागवड करून विक्री केली जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापेमारी करून आरोपी अटक केली. या कारवाईत 10 मोठी झाडे, 60 किलो गांजासह पाच लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पिंजर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले.

पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा खुर्द येथे घराच्या अंगणात मादक पदार्थ गांजाची लागवड केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापेमारी करून आरोपी तुळशीराम रामहरी गावंडे रा. खेर्डा यास ताब्यात घेतले. त्यांच्या घराच्या अंगणातून 12 ते 15 फूट उंचीची 10 मोठी गांजाची झाडे, विक्रीसाठी काढलेला साठ किलो सुका गांजा असा एकूण 5 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात पिंजर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्याच्या कलम 20, 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बघू ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील त्यांच्या पथकातील विनोद तुरकर, महेंद्र मलिये अविनाश पाचपोर, एजाज अहमद, स्नेहा चव्हाण आदींनी केली.

    Post Views:  363


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व